Sarathi सारथी मार्फत "सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम" प्रशिक्षण तुकडीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत
सारथी मार्फत "सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम" प्रशिक्षण तुकडीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील उमेदवारांकडून "सरदार सूर्याजी काकडे सनदी लेखापाल पायाभूत प्रशिक्षण उपक्रम" (SARDAR SURYAJI KAKADE FOUNDATION COURSE FOR CHARTERED ACCOUNTANT) प्रशिक्षण तुकडी करिता प्रायोजित होणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक निकष, अटी शर्ती सारथी, पुणेच्या संकेतस्थळावरील सूचना फलक लिंक पहा: www.sarthi-maharashtragov.in > सूचना फलक > SARDAR SURYAJI KAKADE FOUNDATION COURSE FOR CHARTERED ACCOUNTANT > Candidate Online Application Form > पहावी.
शैक्षणिक अर्हता
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा, त्याला बारावीत किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण कालावधी
निवडलेल्या उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी सहा महिने आहे. अनिवासी स्वरूपाचे नियमित प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थी मार्गदर्शक सूचना नीट वाचण्यात याव्यात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील उमेदवारांनी ०५/०९/२०२४ पर्यंत अर्ज करावेत.
सदर विषयी भविष्यात कोणतीही माहिती /सूचना उपरोक्त लिंक वरच दिली जाईल. वृत्तपत्रात जाहिरात दिली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचनाफलक पाहण्यात यावे.
0 टिप्पण्या