Vayoshri Yojana वयोश्री योजना फॉर्म भरणे चालू, वयोश्री योजनेसाठी पात्रता व निकष
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आपले जीवन चांगले व सुखकर जगण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. वयोश्री योजना जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत चालवली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत महिना 3000 रुपये मानधन मिळणार आहे. 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरीकांना त्यांच्या दैंनदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करणे करीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात "मुख्यमंत्री वयोश्री योजना" राबविण्यास शासन निर्णय जेष्ठना 2022 / प्र.क्र.344/600 दिनांक 06 फेब्रुवारी 2024 शासन मान्यता देण्यात आलेली आहे. 65 वर्ष वय असणा-या जेष्ठ नागरीकांकरीता आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्याकरीता एकरकमी 3000/- रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अर्जासोबत अनुक्रमे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
- अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड/शासननाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्राचे झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- अर्जदाराचे वय 65 वर्षे पूर्ण असलेबाबतचा पुरावा.
- आर्थिक वर्षातील रू. 2.00 लाखाच्या आतील स्वयंघोषणापत्र.
- अर्जदाराचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत, सदर खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था / सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसलेबाबतचे लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र,
- अर्जदारास उपकरण खरेदीसाठी अनुदान प्राप्त होताच एक महिन्याच्या आत उपकरण खरेदी करणार असलेबाबत तसेच उपकरण खरेदी न केल्यास सदरची रक्कम परत घेण्यास हरकत नसलेबाबतचे स्वयंघोषणापत्र. (उपकरण खरेदीची पावती एक महिन्याच्या आत कार्यालयास सादर करणेची आहे).
- अर्जदाराचा उपकरणाची आवश्यकता असलेबाबतचा डॉक्टरांचा तपासणी अहवाल. (सदरचा अहवाल दिनांक 01/04/2024 नंतरचा असावा)
या योजनेत लाभार्थ्यांना मिळणारे उपकरण
एका अर्जदारास एकाच उपकरणाचा लाभ घेता येईल. या योजनेतून
- चष्मा,
- श्रवणयंत्र,
- ट्रायपॉड स्टिक,
- व्हील चेअर,
- फोल्डिंग वॉकर,
- कमोड खूर्ची,
- नि-ब्रेस,
- लंबर बेल्ट
- सर्वाइकल कॉलर इ. उपकरणांपैकी एका उपकरणाच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.
0 टिप्पण्या