Adam master नरसय्या आडम मास्तर यांनी आमदार, खाजदार यांची पेन्शन झीरो करावी अशी मागणी
माजी आमदार नरसय्या आडम मास्तर माकप 1978, 1995 व 2004 मध्ये यांना आमदार करण्यामध्ये सरकारी, निमसरकारी व कामगार वर्ग यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जर सहभाग नोंदवला नसता तर आमदार झालो नसतो. त्यांनी नैतिक जबाबदारी समजून येणाऱ्या पेन्शन मधून एक लाख रुपये त्यांना दिले आहेत.
आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच 775 माजी आमदार व त्यांचे वारसदार यांना 70 कोटी पेन्शन दिली जाते. 60000, 70000, 80000, 9000, 100000, 125000, 150000 अशी सर्वांना पेन्शन मिळत आहे. त्यांनी अशी मागणी केलेली आहे की त्यांचे पेन्शन झिरो करावी.
महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे 288 आमदार व विधान परिषदेचे 78 आमदार आहेत. यांना सगळे भत्ते मिळून 250000 रुपये मिळतात. 90 % आमदार हे कोट्याधी आहेत. रेल्वे प्रवास, विमान प्रवास, त्यांच्या गाडीवरील व्याज माफ अशा अनेक सवलती त्यांना मिळतात. म्हणून माझी आमदार नरसय्या आडम मास्तर मागणी करतात की, वर्षाला जे दोनशे कोटी वेतनावर खर्च होतात त्यामध्ये 50 टक्के वेतन कपात केली तर आमदारांच्या वेतनावर शंभर कोटी खर्च येईल. व महाराष्ट्र शासनाचे शंभर कोटी रुपये वाचतील. वेतन कपातीमुळे वाचलेला पैसा राज्यातील 18 लाख नोकरदारांना त्याची पेन्शन देता येईल. ते पुढे असेही म्हणतात, माझ्या हातामध्ये राज्याचे बजेट द्या एका आठवड्यामध्ये 50 कोटी रुपये मी जमा करून दाखवतो.
0 टिप्पण्या