बैलपोळ्याचे मंगलाष्टक
महादेवाच्या पिंडीसमोर !
शोभे कैसा नंदीराज !!१!!
श्रावण मासी हर्ष मानसी !
सण पोळ्याचा आज !!२!!
आम्रपानाचे बांधुनी तोरण !
गंध अक्षदा फुले अर्पण !!३!!
जगाचा पोशिंदा बळीराजा !
भावे करू तया वंदन!!४!!
सण बैलांचा आहे आज पोळा !
बळीराजा घरी सोहळा !!१!!
मखमली झुली रंगवली शिंगे !
कपाळी शोभती भाशिंगे !!२!!
सर्जा राजा कैसे सजले धजले !
आनंदे मिरवू लागले !!३!!
हनुमंत माझा आदरे हा पूजिला !
पुरणपोळी द्या नंदी राजाला !!४!!
शिवमंगल सत्यध्यान...
संकलित
0 टिप्पण्या