Ganeshpuja श्रीगणेश प्राणप्रतिष्ठा आवश्यक साहित्य, प्राणप्रतिष्ठा, श्रीगणेश पूजा, श्रीगणेश पूजा प्रारंभ, अथ पत्र पूजा, अथ अंग पूजा, दूर्वायुग्म पूजा, श्रीगणेशोत्सव आणि आपण घ्यावयाची जबाबदारी

Ganeshpuja श्रीगणेश प्राणप्रतिष्ठा आवश्यक साहित्य, प्राणप्रतिष्ठा, श्रीगणेश पूजा, श्री गणेश पूजा प्रारंभ, अथ पत्र पूजा, अथ अंग पूजा, दूर्वायुग्म पूजा, श्रीगणेशोत्सव आणि आपण घ्यावयाची जबाबदारी                                



                         आनंदले सर्वजण,

                         होता श्री गणेशा तुझे आगमन.


श्रीगणेश प्राणप्रतिष्ठा आवश्यक साहित्य

  1. हळद कुंकू
  2. अक्षता
  3. गुलाल
  4. अष्टगंध ( चंदन पावडर ) 
  5. अबीर
  6. सुपारी 10
  7. खारीक5
  8. बदाम5
  9. हळकुंड5
  10. अक्रोड5
  11. ब्लाउज पीस 1
  12. कापसाची वस्त्रे (गेजवस्त्र)
  13. जानवी
  14.  जोड 2
  15. पंचा 1
  16. तांदूळ 
  17. तुळशी 
  18. बेल
  19.  दुर्वाफुले
  20.  पत्रीहार 1
  21. आंब्याच्या डहाळी
  22.  नारळ 2
  23. फळे 5
  24. विड्याची पाने 25
  25. पंचामृतकलश 2
  26. ताह्मण 1
  27. संध्या
  28.  पळीपंचपात्र
  29. सुट्टे 10 रुपये
  30.  नैवेद्याची तयारी
  31. समईवाती
  32. निरांजन
  33. कापूर

श्रीगणेशाची मूर्ती आदल्या दिवशी आणून ठेवावी. गुरूजी येण्यापूर्वी मूर्ती मखरात ठेवावी. वरील सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे. बसण्यासाठी आसन किंवा बेडशीट वापरावे.

 

श्रीगणेश पूजा 

श्रीगणेशाचे पूजन करताना शुचिर्भूत असावे. घरात वाद विवाद न करता प्रसन्नपणे व आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन पूजा करावी. पूजा करणारी व्यक्ती जानवे घातलेली असावी. पूजन करते वेळेस देवास काहीही समर्पण करत असताना ते उजव्या हातानेच वहावे. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वहावे. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा कोणी करावी हे सांगावे. त्यांच्या पेक्षा लहान व्यक्तीने पूजा आनंदाने व प्रसन्न मनाने करावी.

 

श्री गणेश पूजा प्रारंभ

प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे. देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. श्रीगणेश पूजेला सुरुवात करावी.

खालीलप्रमाणे प्रत्येक देवतेचे स्मरण करून नमस्कार करावा

ॐ श्रीमन्महागणपतये नम:॥

ॐइष्ट देवताभ्यो नमः ||

ॐकुल देवताभ्यो नमः ||

ॐग्राम देवताभ्यो नमः ||

ॐवास्तु देवताभ्यो नमः ||

ॐगुरू देवताभ्यो नम:॥

नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे आणि खालीलप्रमाणे मंत्र म्हणावेत

सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः||

लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः||

धुम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः||

द्वादशैतानि नामानी यःपठेद् शृणुयादपि ||

विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा ||

संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ||

अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वहाव्यात. नंतर उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुले घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा. रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके मन्मथ नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ, बृहस्पति वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, तुला स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, सिंह स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ....॥

मम आत्मन: श्रुतिस्मृति-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं...........गोत्रोत्पन्नाय ........शर्माणं अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥

पाणी ताह्मणात सोडावे. पुन्हा पाणी हातात घेऊन खालीलप्रमाणे उच्चार करावा.

आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं, शरीर शुद्ध्यर्थं षडंगन्यासं कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥

ताह्मणात पाणी सोडावे.नंतर श्रीगणेशाचे स्मरण करून कलश,शंख,घंटा,दिवा समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे.


॥प्राणप्रतिष्ठा॥

पुढीलप्रमाणे उच्चार करून मुर्तीच्या नेत्रांना दुर्वांनी तूप लावावे. दोन्हीही हातांनी मूर्ती वर छाया करावी.

अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥

॥ॐ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥

अस्यां मूर्तौ १ प्राण २ जीव ३ सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा॥

नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा. डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून खालीलप्रमाणे उच्चार करावा.

गर्भाधानादि षोडष संस्कार सिद्ध्यर्थं षोडष प्रणवावृती: करिष्ये॥

आणि श्रीगणेशास स्पर्श करून मनात १६वेळा "ॐ" म्हणावे नंतर श्रीगणेशाच्या नेत्रांना तूप लावावे.

ॐअस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च।

अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥

श्रीगणेशाचे ध्यानं करावे

ॐएकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं।

पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥

श्रीगणेशाच्या पायांवर अक्षता वहाव्यात.

ॐआवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर।

अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥

श्रीगणेशास अक्षता वाहून सिंहासन अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी.

ॐनानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितम्।

आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी  शिंपावे

ॐपाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो।

भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥

श्रीगणेशाच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त  पाणी वहावे.

ॐनमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर।

नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥

ताह्मणात 4 वेळा पाणी सोडावे.

ॐकर्पूरवासितं वारि मंदाकिन्या:समाहृतम्।

आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥

श्रीगणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपावे.

ॐगंगादिसर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया हृतम्।

तोयमेतत्सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या चरणांवर पंचामृत वहावे.

ॐपंचामृत मयोनीतं पयः दधी घृतं मधु

शर्करा सह संयुक्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम्

श्रीगणेशास शुद्धोदक वहावे.

ॐश्रीगणेशाय नमः शुद्धोदकं समर्पयामी

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात 

ॐश्रीगणेशाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु॥

श्रीगणेशास वस्त्रे वहावीत.

ॐसर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे।

मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्।

श्रीगणेशास यज्ञोपवीत वहावे.

ॐदेवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्।

ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥

श्रीगणेशास गंध लावावे.

ॐश्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्।

विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात ॐअक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:।

मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥

श्रीगणेशास हळद वहावी. 

ॐहरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी।

सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास कुंकू वहावे ॐहरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्।

वस्त्रालंकारणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास शेंदूर वहावा ॐउदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्।

सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास गुलाल अबीर वहावे.

ॐज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे।

नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥

श्रीगणेशास फुले, हार, कंठी, दुर्वा वहावे.

ॐमाल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो।

मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥


॥अथ अंग पूजा॥

श्रीगणेशाच्या प्रत्येक अवयवांवर अक्षता वहाव्यात.

ॐगणेश्वराय नम:-पादौ पूजयामि॥(पाय)

ॐविघ्नराजाय नम:-जानुनी पू०॥(गुडघे)

ॐआखुवाहनाय नम:-ऊरू पू०॥(मांड्या)

ॐहेरंबाय नम:-कटिं पू०॥ (कंबर)

ॐलंबोदराय नम:-उदरं पू०॥ (पोट)

ॐगौरीसुताय नम:-स्तनौ पू०॥(स्तन)

ॐगणनायकाय नम:- हृदयं पू॥(हृदय)

ॐस्थूलकर्णाय नम:-कंठं पू०॥(कंठ)

ॐस्कंदाग्रजाय नम:-स्कंधौ पू०॥(खांदे)

ॐपाशहस्ताय नम:-हस्तौ पू०॥(हात)

ॐगजवक्त्राय नम:-वक्त्रं पू०॥(मुख)

ॐविघ्नहत्रे नम:-ललाटं पू०॥(कपाळ)

ॐसर्वेश्वराय नम:- शिर:पू०॥(मस्तक)

ॐगणाधिपाय नम:-सर्वांगं पूजयामि॥

                   (सर्वांग)


अथ पत्र पूजा

श्रीगणेशास विविध पत्री अर्पण कराव्यात.

ॐसुमुखायनम:-मालतीपत्रं समर्पयामि॥(मधुमालती)

ॐगणाधिपायनम:-भृंगराजपत्रं॥(माका)

ॐउमापुत्रायनम:-बिल्वपत्रं॥(बेल)

ॐगजाननायनम:-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा)

ॐलंबोदरायनम:-बदरीपत्रं॥(बोर)

ॐहरसूनवेनम:-धत्तूरपत्रं॥(धोत्रा)

ॐगजकर्णकायनम:-तुलसीपत्रं॥(तुळस)

ॐवक्रतुंडायनम:-शमीपत्रं॥(शमी)

ॐगुहाग्रजायनम:-अपामार्गपत्रं॥(आघाडा)

ॐएकदंतायनम:-बृहतीपत्रं॥(डोरली)

ॐविकटायनम:-करवीरपत्रं॥(कण्हेरी)

ॐकपिलायनम:-अर्कपत्रं॥(मांदार)

ॐगजदंतायनम:-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा)

ॐविघ्नराजायनम:-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत)

ॐबटवेनम:-दाडिमपत्रं॥(डाळिंब)

ॐसुराग्रजायनम:-देवदारुपत्रं॥(देवदार)

ॐभालचंद्रायनम:-मरुपत्रं॥(पांढरा मरवा)

ॐहेरंबायनम:-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ)

ॐचतुर्भुजायनम:-जातीपत्रं॥(जाई)

ॐविनायकायनम:-केतकीपत्रं॥(केवडा)

ॐसर्वेश्वरायनम:-अगस्तिपत्रं॥(अगस्ति)

श्रीगणेशास धूप,अगरबत्ती ओवाळावी.

ॐवनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:।

आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास दीप,निरांजन ओवाळावे.

ॐआज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।

दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥

श्रीगणेशास नैवेद्य, प्रसाद समर्पण करावा.

ॐशर्कराखंडखद्यानी दधिक्षीरघृतानिच।

आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास विडा अर्पण ॐकरावापूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं।

कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या समोरील विड्यावर दक्षिणा ठेवावी.

ॐहिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:।

अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥

श्रीगणेशाच्या समोरील नारळावर पळीभर पाणीq सोडावे आणि त्यावर एक फुल वहावे 

ॐइदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव।p

तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥

खालीलप्रमाणे श्रीगणेशास दोन-दोन दुर्वा वहाव्यात 


दूर्वायुग्म पूजा

ॐ गणाधिपायनम:-दूर्वायुग्मं समर्पयामि॥

ॐ उमापुत्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ अघनाशनायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ विनायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ ईशपुत्रायनम:-दूर्वायुग्मं०॥

ॐ सर्वसिद्धिप्रदायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ एकदंतायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ इभवक्त्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ आखुवाहनायनम:-दूर्वायुग्मं ०॥

ॐ कुमारगुरवेनम:-दूर्वायुग्मं ०॥

श्रीगणेशाची आरती करावी.

स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी.

ॐयानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।

तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥

श्रीगणेशास नमस्कार करावा.

ॐनमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद।

नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥

श्रीगणेशाची प्रार्थना करावी.

ॐविनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत।

पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय॥i 

एक पळीभर पाणी ताह्मणात सोडावे.

ॐअनेन मया यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥


श्रीगणेशोत्सव आणि आपण घ्यावयाची जबाबदारी                        
  1. घरचा गणपती १ फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी.
  2. मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे अशी असावी.
  3. सिंहासनावर किंवा लोडला टेकुन बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम आहे.
  4. साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नयेत. 
  5. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये. कारण शिव पार्वतीची पुजा शिवलिंग स्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे.
  6. गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. 
  7. गणपतीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करावी.
  8.  मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे व दुसरी मुर्ती आणून प्रतिष्ठापना कराव. मनात कोणतेही संकोच, भय व शंका आणु नये.
  9. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये.
  10.  गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये. 
  11. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.
  12. काही ठिकाणी गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. ही अत्यंत विकृत प्रथा आहे. गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे. पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नये. अशा प्रथा बंद कराव्यात.
  13. विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ, मृदंग, अभंग म्हणत श्री गणेशाला निरोप द्यावा. अश्लील नृत्य व गाणी वाजवून विकृत चाळे करू नये. वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नये.
                          बाप्पा मुळे नवचैतन्य येते, 
                          दुःख सारे दूर जाते, 
                          त्याच्या आशीर्वादामुळे मंगलमय
                          सारे जीवन होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या