सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन साजरा
मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवचरित्राचे गाढे अभ्यासक डॉ.चंद्रकांत चव्हाण तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय कार्यकारणी सदस्य शिवश्री उत्तमराव माने उपस्थित होते. डॉ. श्री चव्हाण सरांनी शिवचरित्र सांगत असताना मराठा सेवा संघ स्त्रियांना मानसन्मान देण्याबरोबर युवकांमध्ये शिव विचार पेरण्याचे कार्य करीत आहे. मराठा सेवा संघामुळे आज हिंदू- मुस्लिम दंगलीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु असल्याचे सांगत असताना अनेक उदाहरणे दिली. सुरुवातीला व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या कार्याचा इतिहास दाखवण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत मराठा बांधवांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये तरुण भारत या दैनिकाचे श्री प्रशांत माने साहेब, नवी पेठ व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक मुळीक साहेब, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय पदव्या संपादन केलेले VVP इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री अरुण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्णा पवार, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू श्री साईराज हणमे, वीर पत्नी सविता मानेताई , दादपूरचे प्रगतशील बागायतदार श्री भीमराव चटके, सोमपा मेडिकल ऑफिसर डॉ. शेळवणे मॅडम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे नित्य पूजक श्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक शिवश्री राजन(भाऊ)जाधव, उद्योजक व उपाध्यक्ष श्री बब्रुवाहन माने देशमुख, महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशनचे मा. अध्यक्ष शिवश्री दत्तामामा मुळे, कोषाध्यक्ष श्री शिरीष भोसले, केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री विश्वनाथ गायकवाड, श्री विजय कोडक, कृषी अधिकारी श्री दीपक नलावडे, जिजाऊ ब्रिगेडच्या नंदाताई शिंदे, उज्वलाताई साळुंखे, शिवमती शेळवणे ताई , अभंजलीताई जाधव, कृषी कक्ष प्रमुख श्री दीपक नलावडे, तालुकाध्यक्ष शिवश्री हनुमंत पवार सर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष श्री प्रकाश ननवरे, श्री सचिन चव्हाण, श्री श्रीनिवास सावंत, श्री कल्याण गव्हाणे, शिक्षक कक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री जीवन यादव सर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री परशुराम पवार, वधुवर कक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अंबादास सपताळे, शहराध्यक्ष श्री राम माने, माईंड गुरु नानासाहेब साठे, निवृत्ती अभियंता श्री पाटील मूर्तिकार नितीन जाधव, श्री संतोष माने, श्री प्रीतम भैय्या परदेशी ,श्री प्रकाश डोंगरे , श्री मोहन कमीतकर, श्री कुमार शिरसागर, श्री नितीन मोहिते, श्री नागनाथ पवार व असंख्य शिव मावळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री डॉ. जी के देशमुख सर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार सर यांनी केले तर आभार जिल्हासचिव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांनी विशेष प्रथम घेतले.
0 टिप्पण्या