नंदी राजाची आरती
जगाचा पोशिंदा साह्य बळीराजाला !!धृ !!
महादेवाच्या पिंडीसमोर उभा डौलानं !
विश्वन्नाथा प्रथम पुजा तुझे दर्शन !!१!!
तुझ्याच कष्टामुळे आम्हा मिळतो घास !
उपकाराची जाणीव सण पोळा विशेष !!२!!
रंगवू शिंगे बांधू भाशिंगे मखमली झुली !
गंध अक्षदा लावुनी दीप वाहू पुष्पांजली !!३!!
आनंदाने गाऊ गाणे बांधूनी तोरण !
पुरणपोळी नैवेद्य चारु करुया नमन !!४!!
सर्जा राजा आम्हावरी असो तुझी माया !
विनवितो गंगाधर अर्पुनी हनुमंती काया!!५!!
चाल : काकड आरतीची किंवा आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म...
संकलित
0 टिप्पण्या