पिकाचे नुकसान झाल्यास एवढ्या तासाच्या आत विमा कंपनीस विमा कंपनीस फोटोसह माहिती द्यावी
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून आवाहन करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरिप हंगाम सन 2024 - 2025 मध्ये सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र पावसामुळे जलमय होणे, पूर, भुस्खलण, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा घटनांमुळे विमा संरक्षित पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतक-यांनी संबंधित विमा कंपनीस घटना घडल्यापासुन 72 तासांच्या आत त्यांच्या विमा संरक्षित पिकांचे नुकसान झालेले असल्यास त्याबाबत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह सूचना (Intimation) विमा कंपनीस यांना देण्याकरिता पुढील पर्यायांचा वापर करावा.
सन 2024-25 मध्ये अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनीचे नाव : ओरिएन्टल इन्शुरंस कंपनी लि.
1) क्रॉप इन्शुरंस अप्लिकेशन (Crop Insurance App)
- गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.
- ॲप ओपन झाल्यानंतर continue as a guest या पर्यायावर क्लिक करावे.
- क्रॉप लॉस या ऑप्शन वर क्लिक करावे.
- क्रॉप लॉस इंटिमेशन क्लिक करावे.
- मोबाईल नंबर टाकावा.
- ओटीपी येईल ओटीपी सबमिट करावा.
- सीजन खरीप निवडावा.
- त्यानंतर वर्ष 2024 निवडावे.
- प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही स्कीम निवडावी.
- त्यानंतर स्टेट महाराष्ट्र निवडावे.
- from where did you enrolled या पर्यायांमध्ये विमा ज्या ठिकाणाहून भरला आहे तो पर्याय निवडावा जर विमा सीएससी वरून काढला असेल तर सीएससी निवडा जर विमा बँक मधून काढला असेल तर बँक हा पर्याय निवडा.
- do u have application / policy number ला टच करून तिथे आपला पॉलिसी नंबर किंवा receipt नंबर टाकावा.
- Done पर्यायावर क्लिक करावे.
- पॉलिसी नंबरला क्लिक करावे.
- पुन्हा लाल कलर मधील स्क्रीनला टच करावे जिथे की आपले पीक दिलेले असते.
- त्यानंतर Type of incident मध्ये Inundation या पर्यायावर क्लिक करावे.
- Date of incidence मध्ये ज्या दिवशी जास्त पाऊस झाला आहे, त्या दिवसाची तारीख टाकावी, त्या तारखेपासून 72 तासाच्या आत आपण पिक नुकसानीचे तक्रार करू शकतो.
- status of crop at the time of incidance या पर्यायांमध्ये स्टैंडिंग क्रॉप (standing crop) हा पर्याय निवडावा.
- expected loss in percentage मध्ये पिकाच्या नुकसानीची टक्केवारी टाका.
- शेतामध्ये जिथे नुकसान झाले आहे त्याचा एक फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करावा.
- आणि शेवटी आपली तक्रार सबमिट करावी.
- तक्रार झाल्यानंतर एक docket आयडी येतो तो सांभाळून आपल्याजवळ ठेवावा.
- Disease( रोगाची), पेस्ट अटॅक Drought, Animal attack हे पर्याय कोणीही तक्रार करते वेळेस निवडू नयेत
2) कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाइन टोल फ्री क्र. 14447
3) विमा कंपनीचे तालुक्यातील कार्यालय
4) तालुका कृषि अधिकारी कार्यालय
याद्वारे नुकसानीबाबत सूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कार्यालय, पिक विमा कंपनी तालुका प्रतिनिधी व संबंधित गावाचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत कऱण्यात आले आहे.
0 टिप्पण्या