काय चाललं कळना
काय चाललं कळना,
बळीराजाचा कोणी विचारच करं ना,
त्याच्या मालाला हमीभाव मिळनां,
खरंच काय चाललं कळना l
जो तो उठतो आणि नवीन योजना काढतो,
नाव मात्र सर्वसामान्यांचे,
फायदा मात्र धनदांडग्यांना,
खरंच काय चाललं कळना I
दुधाचा भाव वाढला की पशुखाद्याचे भाव वाढतो,
दुधाचा भाव कवडीमोल झाला,
तरी पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेला,
खरंच काय चाललं कळना I
राजकारणाची एवढी भेळ मिसळ झाली की,
कोण कुठल्या पक्षात हेही कळना,
खरंच काय चाललं कळना I
सोशल मीडियाच्या जमान्यात,
खरं काय आणि खोटं काय,
हेही कळेना,
खरंच काय चाललं कळना I
कवी किरण
0 टिप्पण्या