Baldin बालदिन - पंडित नेहरूंचे संस्कृती व युवा पिढी नवविचार
कोलंबो विद्यापीठात पदवीदान समारंभाच्या अध्यक्षपदावरून 1950 रोजी भाषण करताना त्यांनी मूलभूत शहाणपण या विषयावर आपले विचार मांडले. धर्मव्यतिरिक्त विविध क्षेत्रात अलीकडे लोक अत्याग्रही, दुराग्रही व अविवेकी बनू लागले आहेत. आधुनिक जगातील आपल्या समस्या सोडवण्यास एकापेक्षा अधिक विविध प्रकारचे मार्ग व दृष्टिकोन असू शकतात. या सर्व बाबी आज आपण समजून घेण्यास तयार होत नाही. या संकुचित मनोवृत्तीतून आपण बाहेर पडण्यास तयार झाले पाहिजे. आजच्या आपल्या युवा पिढीला जीवनाची समग्र दृष्टी नाही. आपण कितीही हुशार व चतुर असलो तरी शहाणपण मात्र आलेले नाही. आपण जलद वाहनाच्या साह्याने जगात जलदरीतीने प्रवास करतो व आकाशवाणीच्या साह्याने आपणास परस्पर विषयी चटकन माहिती समजते. असे असले तरी आपली मने मात्र अजूनही संकुचित वृत्तीचीच राहिलेली आहेत. विद्यार्थ्यांना पदवीधर करून त्यांच्या हातांना काम दिले, रोजगार दिला तर बेकारीचा प्रश्न निर्माण होणार नाही. आपली सर्वसधारण वृत्तीही विधायक, नवसर्जनाची व निर्मितीची असली पाहिजे. शिक्षण हे संस्कृती घडवण्याचे स्थान आहे. संस्कृती ही शांत, संयमी व सहिष्ण असते. अलीकडे व्यक्तीच्या प्रकारे कपडे वापरतात किंवा आहार घेतात किंवा काही किरकोळ गोष्टी करतात त्यावरून त्यांची संस्कृती ओळखण्याची कल्पना रूढ होऊ पाहत आहे. पण यावरून संस्कृती ठरत नाही. प्रत्येक देशाला बदलत्या काळाप्रमाणे स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी काही एक संस्कृती असते व ते तिचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक समाजाला व देशाला आपले वेगळेपण व्यक्त करणारी संस्कृती असते. परंतु आपल्या राष्ट्रीय संस्कृती पेक्षा अधिक खोल अशी एक संस्कृती असते व ती म्हणजे मानव संस्कृती होय. ही मानव संस्कृती नसेल तर राष्ट्रीय संस्कृतीला मुळीच आधार राहत नाही.
आताची पिढी धावपळ करताना आपल्याला पाहावयास मिळते, परंतु त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. उद्याचा भारत कसा असेल हे मला सांगता येणार नाही. परंतु भौतिक पातळीवर भारताने प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे. आपल्या प्रचंड लोकसमुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी पंचवार्षिक योजना आपण पूर्ण कराव्यात. धर्म, भाषा, जात, प्रांत इत्यादीच्या नावावर चाललेले संघर्ष आपण थांबवले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या कृतीप्रमाणे तसेच क्षमतेप्रमाणे आपला विकास घडवून आणण्यासाठी वर्ग रहित व जातीरहित समाज निर्माण करण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे.
0 टिप्पण्या