Once more वन्स मोर व माऊस इयत्ता पहिली मराठी बालभारतीच्या पुस्तकातील शब्दांचा अर्थ आपल्याला माहित आहे का ?
इयत्ता पहिलीच्या बालभारती मराठी पुस्तकातील कविता "जंगलात ठरली मैफिल"या कवितेची शेवटची ओळ...
" वन्स मोर, वन्स मोर, झाला शोर!"
आलेली आहे. वन्स मोर हा इंग्रजी शब्द वापरल्याने सोशल मीडिया वरती यूजर्सने नाराजी व्यक्त केलेली आहे.
वन्स मोर म्हणजे काय? चला तर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात.
वन्स मोर या शब्दाचा शब्दशः मराठी मध्ये अर्थ आहे "पुन्हा एकदा, पुन्हा एकदा".
जंगलात ठरली मैफल
जंगलात ठरली नाचगाण्याची मैफल अस्वल म्हणालं, ही तर हत्तीची अक्कल.
तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले, नाही ना बात ?
पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर.
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
मुंगीने लावला वरचा सां आवाज आवाज ओरडला ससा.
ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर झाला शोर !
- पूर्वी भावे
गुंडू-पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिकीमिकी माऊस !
या ओळी मध्ये माऊस हा शब्द आलेला आहे. चला तर त्याचा आपण अर्थ जाणून घेऊयात.
माऊस म्हणजे काय ?
माऊस म्हणजे एक छोटे हार्डवेअर इनपुट उपकरण ज्याच्या साह्याने संगणकाच्या स्क्रीनवर असणाऱ्या कर्सरची हालचाल नियंत्रित केली जाते. माऊसच्या साह्याने युजर्सला संगणकावर फोल्डर, फाइल्स, विविध मजकूर व विविध चिन्हे इत्यादी निवडता येतात.
माऊस या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे उंदीर. माउस म्हणजे संगणकाचे एक उपकरण किंवा उंदीर असा त्याचा अर्थ होतो.
0 टिप्पण्या