पेहे शिक्षण संकुलाच्या प्रांगणात रंगला ‘खेळ पैठणीचा’ सोहळा
या कार्यक्रमात तब्बल १०२ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खेळांमधून महिलांनी केवळ स्पर्धेचा थरार अनुभवला नाही, तर हास्य-विनोदांनी भरलेला आनंददायी माहोल तयार झाला.
खेळांची रंगतदार मेजवानी
‘खेळ पैठणीचा’ उपक्रमात संगीत खुर्ची, कपाळावर टिकली लावणे, फुगा फोडणे, मनोरे रचने, रुमालाने बाटली भरणे, पिना ओवणे, तळ्यात-मळ्यात असे एकापेक्षा एक मनोरंजक खेळ घेण्यात आले. प्रत्येक खेळात महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
विजेत्या ठरल्या ‘पैठणीच्या मानकरी’
या खेळांच्या माध्यमातून सौ. सपना सुमित गिड्डे यांनी सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आणि ‘पैठणीच्या मानकरी’ ठरल्या. द्वितीय क्रमांक सौ. शुभांगी श्रीराम गायकवाड यांना तर तृतीय क्रमांक सौ. निता शरद लोकरे यांना मिळाला.
मान्यवरांकडून बक्षीस वितरण
विजेत्या स्पर्धकांना प्रशालेचे प्राचार्य श्री मारुती गायकवाड सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनीषा गायकवाड यांच्या शुभहस्ते पैठणीसह बक्षिसे प्रदान करण्यात आली.
अँकरिंग व आयोजनाचा उत्साह
कार्यक्रमाचे अँकरिंग एन. पी. सर व सोशल मीडियावरील लोकप्रिय रील स्टार काजल लोखंडे यांनी करून वातावरण रंगतदार केले. खेळांची रचना व व्यवस्थापन करण्यासाठी महिला शिक्षिका श्रीम. स्नेहल देशपांडे, सौ शीतल पाटील, सौ प्रतिज्ञा माने, सौ रोहिणी गायकवाड, सौ अंजली सांगोलकर, सौ रूपाली इकारे, सौ वंदना म्हेत्रे, सौ विद्या रोडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पालकांचा मोठा सहभाग दिसून आला. तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे ठरले. यामध्ये श्री दत्तात्रय टरले, श्री तानाजी पवार, श्री मदनकुमार चव्हाण, श्री रामदास कौलगे, श्री रामचंद्र भोसले, श्री सुग्रीव आमराळे, श्री श्रावण शिंदे, श्री दत्तात्रय जमदाडे, नितीन भुसनर, श्री समाधान खारे, श्री कुलदीप गायकवाड, श्री अमृत वाघमारे, श्री राहुल बागल, प्रा. श्री धनाजी गायकवाड, प्रा.श्री बाळासाहेब पांढरे, श्री योगेश गायकवाड, श्री नितीन गायकवाड आदींचा विशेष सहभाग होता.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये ऐक्यभाव, स्पर्धात्मकता व श्रावणाच्या उत्सवी वातावरणाला नवा आयाम लाभला.
नवीन ब्लॉग वाचण्यासाठी पुढील निळ्या अक्षरावरती क्लिक करा...
रात्रीचे जेवण किती वाजता घ्यावे? आरोग्यासाठी योग्य वेळ व वैज्ञानिक कारणे
0 टिप्पण्या