International Sports Day आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्वभूमी व इतिहास, UN (United Nations) संयुक्त राष्ट्र संघटनेचे सहकार्य, खेळातून शांतता, 2022 ची थीम, जागतिक क्रीडा दिनाचे महत्त्व

International Sports Day आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्वभूमी व इतिहास, UN (United Nations) संयुक्त राष्ट्र संघटनेचे सहकार्य, खेळातून शांतता, 2022 ची थीम, जागतिक क्रीडा दिनाचे महत्त्व

   
               खेळ, व्यायाम या गोष्टीची आवड साधारणतः मुलांमध्ये व तरुणांमध्ये आढळून येत असते. हा त्यांच्या सहजवृत्तीचा भाग असतो. मुले व तरुण या वयामध्ये भरपूर खेळ खेळत असतात. मुलांनी ह्या वयात कोणत्याही कारणे खेळणे टाळले, तर त्याच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत असतो. त्यांच्या शरीराची हालचाल न झाल्यामुळे त्यांचं वजन जास्त वाढून लठ्ठपणा व आळशीपणा वाढतो. त्यामुळे लहान वयामध्येच त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी लागते. या लहान वयातच खेळाची आवड निर्माण झाली की नंतरच्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग बनतो. खेळामुळे मन व शरीर कणखर बनते. सर्वसाधारण मुलांना जसा व्यायामाचा फायदा होतो तसा तो शारीरिक किंवा मानसिक अपंगांना सुद्धा होतो. मुलांमधील खेळा संबंधीची उत्सुकता त्यांना खेळण्याची प्रेरणा देते, प्रोत्साहित करते गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. देशातील सर्व नागरिकांना व्यायामाच्या खेळाच्या सवलती उपलब्ध झाल्यास निरोगी प्रजा निर्माण होऊ शकते. विविध देशांनी व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवलेले आपल्याला पहावयास मिळतात. जर्मन GDR प्रजासत्ताकाने आपल्या घटनेतच व्यायामाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे लहान मुले, तरुण, वृद्ध, सर्व स्त्री पुरुष, वृद्ध इत्यादींना व्यायामाचे महत्त्व समजण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाची पार्श्वभूमी व इतिहास
युनोने  6 एप्रिल 1896 मध्ये पहिल्या ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन अथेन्स (ग्रीस) येथे केलेले होते.  2013 मध्ये 6 एप्रिल हा दिवस विकास व शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करावा असे घोषित करण्यात आले. 2014 पासून 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

खेळातून शांतता
खेळ हा व्यक्तीस शांतता व त्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी योगदान देतो. या विश्वासावर IOC ची स्थापना करण्यात आली. ऑलम्पिक चळवळ जगातील शांतता आणि ऑलम्पिक तत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाचा वापर करण्यासाठी दररोज प्रयत्न करते.

UN (United Nations) संयुक्त राष्ट्र संघटनेचे सहकार्य
विकास आणि शांततेसाठी खेळाचे योगदान संयुक्त राष्ट्रांनी फार पूर्वीपासून ओळखले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केलेल्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी खेळाडूंच्या सुकृतीचा प्रसार करण्यासाठी IOC व UN यांच्यातील सहकार्याने मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.

जागतिक क्रीडा दिनाचे महत्त्व
शांतता व विकासाच्या उद्दिष्टांना चालना देण्यासाठी खेळ हे एक खूप फायदेशीर असे साधन आहे. नि:पक्षपातीपणा, संघ बांधणी, समानता, शिस्त, चिकाटी, आदर अशा पद्धतीचे वेगवेगळे गुण विकसित होतात. खेळामुळे विद्यार्थ्यात भावनिक ,शारीरिक व सामाजिक कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे संकट काळात मदत होते. खेळ हे कमी खर्चाचे व खूप परिणामकारक साधन आहे. जे सर्व देशांतील लहान मोठे, गरीब श्रीमंत, कृष्णवर्णीय गौर वर्णीय असा भेदभाव नष्ट करतात. प्रत्येक व्यक्ती अधिक शांत, निरोगी, सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी खेळाचे खूप महत्त्व आहे.

2022 ची थीम -  "सर्वांसाठी शाश्वत आणि शांततापूर्ण भविष्य सुरक्षित करणे: खेळाचे योगदान."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या