Helmet म्हणजे काय? याचा मराठीमध्ये अर्थ 99% लोकांना माहित नाही. चला तर त्याचा अर्थ आपण जाणून घेऊयात.
प्रवासामध्ये डोक्याचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारे मजबूत असे कवच म्हणजेच हेल्मेट होय. Helmet हेल्मेट या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ शिरस्त्राण असा आहे.
धावपळीच्या जीवनामध्ये संरक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. संरक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. ज्यावेळेस प्रवासी दोन चाकी गाडीवरून प्रवास करत असतो. तेव्हा त्याचे अपघातामध्ये संरक्षण होण्यासाठी त्याच्या डोक्यावर कवच असणे आवश्यक आहे. जर डोक्यावर हेल्मेट शिरस्त्राण नसेल तर डोक्याला इजा होऊन प्रवासी दगावण्याची शक्यता असते. म्हणून वाहतुकीच्या नियमांमध्ये हेल्मेट सक्ती केलेली आहे. फार फार वर्षांपूर्वी पासून शिरस्त्राणाचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जात होता. युद्धामध्ये डोक्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होत होता.
0 टिप्पण्या