Aashadhi Ekadashi आषाढी एकादशी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

आषाढी एकादशी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 



ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करत होते. श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी- समारंभांसहीत थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली होती. ती प्रथा आजही दिमाखदार पद्धतीने चालवली जाते. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे इत्यादी लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून मिळत असायचे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत होती. सरकारने 1852 मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.


रिंगण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे. रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे दोन प्रकारचे असते.


अश्व व बैल जोडी 

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते. यासाठी वेगवेगळया कुटुंबातील बैल जोडीचे परीक्षण करून चांगले बैल निवडले जातात. या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः त्यांच्या आश्र्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. यासाठी रथाच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो. या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारीमध्ये दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या