Aashadhi Vari ST Buses आषाढी वारी निमित्त एसटी बसेस व प्रवासी वाहतूक व्यवस्था

आषाढी वारी निमित्त एसटी बसेस व प्रवासी वाहतूक व्यवस्था



आषाढी वारी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागातर्फे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी एसटी बसेसची सोय करण्यात आलेली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी आषाढी वारी निमित्त राज्यभरातून व वेगवेगळ्या राज्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. येणाऱ्या लाखो भाविकांचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येण्या जाण्या करता विशेष एसटी बसेसची सोय करत असते. दरवर्षीप्रमाणे आषाढी सोहळा 2024 निमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागाने भाविक भक्तांसाठी विशेष एसटी बसेसची सोय केलेली आहे.

                  आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असल्यामुळे पंढरपूरमध्ये खूप गर्दी असते. या गर्दीमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पडत नसल्याकारणाने वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. वाहतूक व्यवस्था सुखकर व सुरळीत पार पाडण्यासाठी एसटी डेपो निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यांनी चार एसटी डेपो निर्माण केलेले आहेत. त्या डेपो मधून निघणाऱ्या बसेस कोणत्या आहेत त्या पुढील प्रमाणे...

      1) भीमा यात्रा बस स्थानक (मोहोळ)

  • बीड, परभणी 
  • लातूर, धाराशिव 
  • छत्रपती संभाजीनगर 
  • जालना 
  • यवतमाळ, अमरावती 
  • अकोला, बुलढाणा 
  • नागपूर, वर्धा 
  • सोलापूर
      2) चंद्रभागा नगर यात्रा बस स्थानक (पंढरपूर शहर) 
  • पुणे 
  • सातारा 
  • पालघर
  • रायगड
  •  ठाणे
  •  मुंबई
  •  सांगली 
  • रत्नागिरी
  • अकलूज (आगार)
      3) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यात्रा बस                       स्थानक (टेंभुर्णी रोड) 
  • नाशिक 
  • जळगाव 
  • अहमदनगर
  • धुळे 
  • करमाळा (आगार)

     4) पांडुरंग यात्रा बस स्थानक (औद्योगिक प्रशिक्षण संस्था                  सांगोला रोड) 
  • कोल्हापूर 
  • रत्नागिरी 
  • सांगली 
  • सिंधुदुर्ग 
  • सांगोला (आगार)
वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आषाढी वारी ही नेहमी जुलै महिन्यामध्ये येते. या कालावधीमध्ये पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग हा पिकांची पेरणी करून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारीमध्ये सामील झालेला असतो. वारकरी वारीसाठी कित्येक किलोमीटर पायी चालत आलेला असतो. आलेला वारकरी माघारी सुखरूप आपल्या घरी पोहचावा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसेस सुरु केलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या