Eknath Shinde's sisters letter एकनाथ शिंदेंच्या बहिणीचे भावनिक पत्र सोशल मीडियावर झाले व्हायरल
मा.श्री.एकनाथ (दादा )शिंदे,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
वर्षा बंगला,
मुंबई.
एकनाथदादा,
पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली "मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी" या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको आहेत. याबद्दल तू वाढलेले गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर, बी बियाण्याचे दर कमी कर, शेतीला हमी भाव दे जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाऊजींना पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी समाधानी राहील.
दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा -भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे सगळ्याना सांगतील माझा मामा मुख्यमंत्री झाला त्यामुळे मी एवढे मोठे शिक्षण घेतले म्हणून तुझ्या नावाने दिमाखात फिरतील. माझ्या मामाने शिक्षण मोफत केले. माझ्या मामाने आमच्या शिक्षणाचा भार उचलला म्हणून तुझे नाव जगभर करतील.
दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ रे!
पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी लागतात त्या वस्तूंच्या किंमती कायम कमी करता येतात का ते बघ. आम्हाला फुकटच्या शासकीय योजना नको आहेत.
आम्हाला 1500 रुपये देऊन भावोजी/दाजीच्या जखमेवर मीठ तर लावत नाहीस ना? कारण दुधाला चांगला भाव नाही, शेतमालाला हमी भाव नाही, शेतीला पाणी द्यायला वीज नाही, खते, कीडनाशके यांचा खर्च परवडत नाही......
तुझे दाजी दररोज आत्महत्या करतात, तिकडे लक्ष देता आले तर बघा!
पंधरा लाखचा झालेला प्रवास पंधरा शे येऊन थांबला आहे.
तूझी लाडकी बहिण
0 टिप्पण्या