Mahagai bhatta राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतक्या टक्क्यांनी वाढ झाली

 

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात इतक्या टक्क्यांनी वाढ झाली



राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आलेली आहे. दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46% वरुन 50% करण्यात आलेला आहे. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी, 2024 ते दिनांक 30 जून, 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. महागाई भत्त्यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात येणार आहे. अशाप्रकारे महागाई भत्त्याचा दर 46% वरून 50% करण्यात आलेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या