Javahar Navody Vidyalay जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणीसाठी या तारखेपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज
केंद्र सरकारच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पोखरापूर येथे सुरू असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता सहावी साठी प्रवेश परीक्षा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुदत १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून प्रवेश अर्ज वेळेत भरण्याची सूचना सर्व संबंधित विभागांना कळविण्यात आलेल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळा, खाजगी अनुदानित, खाजगी अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळा व इंग्रजी माध्यम शाळा आदी मान्यताप्राप्त सर्व शाळामधील इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी फार्म भरू शकतात. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांनी व संबंधित पालकांनी htpps://navodaya.gov.in या वेबसाईटवर इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे परीक्षेचे फॉर्म भरण्याचे आवाहन प्राचार्य श्री संजय कोठडी (जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर) यांनी केलेले आहे.
0 टिप्पण्या